
मुंबइर्च्या पिन्स आँफ वेल्स म्यूझियममध्ये घारापुरीच्या लेण्यांतून आणलेली एक उभी मूर्तीही विठ्ठलाची असण्याची शक्यता वाटते. ही मूर्तीही भग्नावस्थेत आहे. हिच्या कमरेच्या वरचा भाग पूर्णपणे नष्ट झालेला आहे. कमरेस वस्त्र, वर मेखला, डाव्या मांडीवर टेकलेला व पोकळीत डाव्या हा

कर्नाटकात मंड्या जिल्ह्यातील गोविंदहळ्ळी येथे, तसेच हसन जिल्ह्यातील हरणहळ्ळी येथे चेन्न केशवाच्या मंदिरात, बसरुल (जि. मंड्या) येथील मल्लिकार्जूनमंदिरात आणि नागलापूर (जि. तुमकूर) येथे विठ्ठलमूर्ती आहेत. बेल्लारी जिल्ह्यातील हंपी येथील विरुपाक्षमंदिरातही विठ्ठलमूर्ती आहे.
तामिळनाडूत श्रीरंगम् (जि.तिरुचिरापल्ली) येथील रंगनाथमंदिरात तंजावर येथील विष्णुमंदिरात विठ्ठलमूर्ती असून ती श्रीदेवीभूदेवीसह आहे. हैदराबाद येथे एका खाजगी संग्रहात विठ्ठलाची एक सुबक मूर्ती आहे.
अहमदनगर जिल्ह्यात आणि नेवाशाजवळ टाकळीमान म्हणून असलेल्या एका गावी एका मंदिरात चतुर्भुज विठ्ठल आढळतो. हे मंदिर यादवकालीन आहे, असे मत सुरेश जोशी ह्या अभ्यासकांनी मांडलेले आहे. टाकळीभान येथील विठ्ठलमूर्तीचे वैशिष्टय म्हणजे ह्या मूर्तीला मिशा कोरलेल्या आहेत. चांदीचे डोळे बसविले आहेत. मस्तकावर शाळुंकेसह शिवलिंग स्पष्टपणे कोरलेले आहे. येथे विठ्ठलाला चार हात आहेत. ह्या मूर्तीची शैली लोकशिल्पाची आहे. आज उपलब्ध असलेल्या विठ्ठलाच्या मूर्ती पाहिल्या, तर त्या कधी दोन हात, तर कधी चार हात असलेल्या आहेत. काही विष्णूच्या रुपात आहेत, तर काही गोपाळकृष्णाच्या रुपात आहेत. मूर्तीच्या हाती कधी शंख-चक्र, तर कधी शंख-पद्म आहे. कधी शंख-वरदमुद्रा, तर कधी शंख अभयमुद्रा आहे. चौकोनी पादपीठावर वा विटेवर उभ्या असलेल्या मूर्ती आहेत; पण कमलफुलात पाय घोट्यांच्या वरपर्यंत झाकलेली मूर्तीही आढळते. कमरेवर हात असणे हे मात्र सर्व मूर्तींना समान असे लक्षण आहे. कोणत्याही मूर्तिलक्षणग्रंथाचा विठ्ठल हा विषय झालेला नाही, मात्र दक्षिणेतील अनेक प्राचीन विठ्ठलमूर्ती ह्या स्कांद पांडुरंगमाहात्म्यात वर्णन केलेल्या विठ्ठलमूर्तीशी ब-याच संवादी आहेत, असे डाँ.ढेरे ह्यांनी नमूद केले आहे.
No comments:
Post a Comment