Thursday, July 5, 2012

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास ९४ लाखांची देणगी....

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी यात्रा (२०१२) काळात भाविकांकडून देणग्यांचा ओघ वाढत असून या वर्षी ९४ लाख रुपये देणगी विक्रीतून मंदिर समितीस ३५ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.
आषाढी यात्रा काळात ८ लाखांपेक्षा जास्त भाविकांनी दर्शन घेतले. मंदिर समितीने १६ लाख लाडू निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले होते. दशमी ते पौर्णिमा या पाच दिवसांच्या काळात ७ लाख १२ हजार लाडूंची विक्री झाली. या विक्रीतून मंदिरास ३५ लाख ६१ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. यात्रा काळात विठ्ठल-रुक्मिणी जवळ बसूवन दक्षिणा गोळा करण्यासाठी बोली बोलली जाते. यंदा विठ्ठलाकडील बोली १ लाख ३० हजारांची तर रुक्मिणीकडे ही बोली ३५ हजारांची होती.