पंढरपूरची माहिती लो

कांनापर्यंत पोहचविण्यासाठी महाराष्ट्र टाइम्स या दैनिकांनी दि. 12 जुलै रोजी आषाढी विशेषांक प्रसिद्ध केला आहे. हा विशेषांक प्रसिद्ध करण्याचे संयोजक विश्वशांती केंद्र (आळंदी माईर्स एमआयटी, पुणे, भारत यांनी केले आहे. या अंकात भरतकुमार राऊत यांनी लिहिलेले 'नाचती वैष्णव भाई रे..' ! यामध्ये आषाढीसारखा जनतेचा उत्सव क्वचित आढळेल असे ते म्हणतात. ह्या विशेषांकात या वारीत... असे मुख्य भाग असून या विशेषांकसाठी मान्यवर डाँ. विश्वनाथ दा. कराड, रघुनाथ मेदगे, गंगाराम तळेकर यांचे लेखन आपणास वाचायला आवडेल. डाँ. जयंत नारळीकर, डाँ. रघुनाथ माशेलकर, डाँ विजय पा. भटकर असे विज्ञानवंतांची मुलाखतीही चांगल्या झाल्या आहेत. विशेषांक मांडणी व छपाई उत्तम आहे.