पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रविवारी भेट देऊन सपत्नीक श्री विठ्ठलाची तुळशीअर्चन पूजा केली. राज्यातील जनतेला सुख, शांती, समृध्दी लाभो, असे साकडे त्यांनी यावेळी श्री विठ्ठल चरणी घातले. मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, शहरात येणार्या भाविकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याचे प्रयत्न शासन करीत आहे. याकामाला गती देण्यासाठी पंढरपूर शहरासाठी वेगळे प्राधिकरण निर्माण करुन तिर्थक्षेत्र तुळजापूरच्या धर्तीवर पंढरपूर तिर्थक्षेत्राचा विकास केला जाईल.राज्यातील चाळीस लाख शेतकर्यांना ६ हजार २०८ कोटींची कर्जमाफी देण्याचा निर्णय आघाडी शासनाने विचारपूर्वक घेतला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. ग्रामविकास राज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह, माजी मंत्री जयवंत आवळे आदी यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी रविवारी सकाळी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे हेलिकॉप्टरने पंढरपूर येथे आगमन झाले. यावेळी केंद्रीय ऊर्जामंत्री सुशिलकुमार शिंदे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आ. सुधाकरपंत परिचारिक आदी उपस्थित होते.
Sunday, January 4, 2009
राज्यातील जनतेच्या समृध्दीसाठी मुख्यमंत्र्यांची श्री विठ्ठल चरणी प्रार्थना....

Wednesday, November 12, 2008
स्टार माझा मराठी ब्लाँग पारितोषिक वितरण सोहळा दिनांक 8 नोव्हेंबर 2008 रोजी 8.00 वाजता स्टार माझा चॅनलवर..
Friday, October 31, 2008
कार्तिकी यात्रा - दिनांक 9 आँक्टोबर 2008 पासून सुरु होत आहे.
दिनांक ९ नोव्हेंबर 2008 रोजी कार्तिक, पंढरपूर यात्रा.
दिनांक 23 नोव्हेंबर 2008 रोजी आंळदी यात्रा.
दिनांक 25 नोव्हेंबर 2008 रोजी ज्ञानेश्वर महाराज समाधी उत्सव - आंळदी
कार्तिकी यात्रा. : कार्तिक शुध्द एकादशीला पंढरपुरात मोठी यात्रा भरत असते. या यात्रेनंतर संतमंडळी व चातुर्मासात भगवद्चिंतनासाठी राहिलेले वारकरी लोक आपापल्या गावी जातात. चातुर्मास संपतो, या यात्रेत नदीच्या वाळवंटात जागोजागी कीर्तनाचे फड असतात. गावातील मठ-मदिरांतून, धर्मशाळेतूनही कीर्तन, भजनाचे कार्यक्रम होत असतात. एकादशीचे दिवशी श्रीविठ्ठलाचा रथ नगरप्रदक्षिणेला निघत असतो. दिंडया निघतात. पैर्णिमेला गोपाळकाला (गोपाळपूर येथे) व त्याच्या दुसरे दिवशी मंदिरात आषाढी यात्रेप्रमाणे महाद्वार काला होतो. या यात्रेला कर्नाटकातून पालख्या व दिंडया येतात. विजापूर, हुबळी, धारवाड, बेळगाव इ. जिल्ह्यांतून लाखो लोक पंढरपूरला येतात. विजापूर जिल्ह्यात इंचगिरी संप्रदायाची शिष्यमंडळी आहेत. भाऊसाहेब महाराज उमदीकर, रामभाऊ रानडे इ. थोर सत्पुरुषांनी भागवत धर्माच्या प्रसाराचे महान कार्य या भागात केले आहे. या प्रांतातील विविध मंदिरांतून श्रीज्ञानेश्वरीच्या निरुपणाचे कार्य, कीर्तने, प्रवचन-पायारणे इ. कानडी भाषेतून चालते. यात्रेच्या निमित्ताने भागवत धर्माच्या प्रचारा-प्रसारामुळे प्रांतभेद संपून स्नेहसंबंध दृढमूल होत आहेत. ''कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु । तेणे मज लावियेला वेधु ॥'' या अभंगातून 'श्रीविठ्ठल' कर्नाटक व महाराष्ट्रातील (भाषा भिन्न असूनही) वारकऱ्यांना भक्तिसूत्राने एकत्रित आणणारा महत्त्वाचा दुवा आहे.
चालू पंढरीच्या वाटेवर... वाचा http://viththal.blogspot.com/
पंढरीच्या आस प्रत्येक वारक-याच्या उरी असते. विठ्ठलाच्या भेटीसाठी कित्येक मैल वाट तुडवत वारकरी आळंदी-देहूत दाखल होत असतात, दरवर्षी न चुकता, कोणत्याही निमंत्रणाशिवाय लाखो वारकरी या सोहळ्यात रंगून जातात. अशा 2008 रोजी झालेल्या वारीचे वर्णन वाचण्यासाठी ई सकाळचे शंकर टेमघरे यांनी त्यांच्या http://viththal.blogspot.com/ ब्लाँग चांगल्या प्रकारे वर्णन केले आहे. चे वाचत असताना आपल्या डोळ्यासमोर वारीतील दिवसभराचा दिनक्रम उभा राहतो.
Tuesday, October 14, 2008
'स्टार माझा' चे आभार...
'स्टार माझा' ने मराठी ब्लाँग स्पर्धोसाठी तृतीय क्रमांकासाठी निवड दिनांक 11 आँक्टोबर 2008 'वेब माझा' या कार्यक्रमात करण्यात आली. आनंद वाटला. पंढरपूरविषयीच्या माहितीच्या ह्या ब्लाँगची आवर्जुन दखल घेतली. त्याबद्दल मी 'स्टार माझा' चे मन:पूर्वक आभार मानतो.
धन्यवाद
विश्वनाथ खांदारे