Wednesday, October 28, 2009

कार्तिकी एकादशी सोहळ्यासाठी चार लाख भाविक दाखल....

कार्तिकी प्रबोधनी एकादशी सोहळ्यासाठी पंढरीत आज चार लाखाहून अधिक वारकरी दाखल झाले आहे। शासकीय महापूजेसाठी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ सायंकाळी पंढऱीत दाखल झाले असून गुरुवारी पहाटे महापूजा होणार आहे। शहर आणि परिसर हरिनामाचा गजरात दुमदुमला आहे।
कार्तिकी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र आंधप्रदेश, कर्नाटक येथून भाविक दाखल झाले आहेत। सप्टेंबर अखेर आणि आँक्टोबर पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीची कामे सुरु आहे। त्यामुळे कोकण, कर्नाटक भागातून येणा-या भाविकांची संख्या कमी आहे। चंद्रभागेच्या वाळवंटात भाविकांची गर्दी झाली आहे। येथे टाकण्यात आलेल्या राहुट्यांमधून किर्तन, भजन, प्रवचनाबरोबरच हरिनामाचा गजर सुरु आहे। श्री। विठ्ठलाच्या पदर्शन रांगेत ३० ते ४० हजार भाविक आहेत। दर्शनासाठी १२ ते १४ तासांचा कालावधी लागत आहे। दर्शनात कोणत्याही प्रकारचा अडथळा होऊ नये यासाठी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गोपीचंद कदम आणि त्यांचे कर्मचारी प्रयत्नशील आहेत। दर्शनरांगेत स्वच्छता ठेवण्यासाठी नगराध्यक्ष सतीश मुळे, मुख्याधिकारी मंगेश चितळे लक्ष देत आहेत।

3 comments:

Mahesh said...

मराठी ब्लॉगर्सचा पहिलावहिला ब्लॉगकॅम्प सिंहगड रोडवरील पु. ल. देशपांडे उद्यानात मोठ्या उत्साहात झाला, १६ जानेवारी १० ला त्याबद्दल सर्व मराठी ब्लॉगेर्सचे अभिनंदन :-) महेश

ram said...

मैत्रीचा आठवणी: आज दुपारी १२:३० वाजता पालखी विश्रांतवाडित दाखल झाली.
सर्व भाविक संत न्यानेश्वराचा दर्शनासाठी आतुरतेने वाट पाहत होते.
अखेर पालखी पोहचल्यावर भाविकांचा विट्ठल नामाचा मोठा जयघोष करत पल्खिचे दर्शन घेतले.
व विश्रांतवाड़ी परिसरात सर्व वारकरयान साठी सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या