Tuesday, July 14, 2015
Monday, July 13, 2015
श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर
श्री. विठ्ठलांच्या दैनंदिन नित्यपुजेच्या योजने बाबतची माहिती.
दिनांक 12/08/2014 रोजी समितीच्या बैठकीतील निर्णयप्रमाणे दिनांक 19/02/2015 पासून इच्छुक भाविकांकडून रु. 51,000/- देणगी घेवून श्री. विठ्ठलाची दैनंदिन नित्यपूजा ( पहाटे 4 ते 6 यावेळेतील ) त्यांचे हस्ते करण्याचे नियोजित करण्यात आले आहे. तसेच त्या पुजेच्या वेळी पदस्पर्श रांगेत उभ्या असलेल्या एका भाविक पती पत्नीला त्या पूजेमध्ये विनामूल्य सहभागी करुन घेण्याचे ठरलेले आहे. सदरच्या नित्यपुजा आषाढी यात्रा ( शुद्ध प्रतिपदा ते वद्य पंचमी), कार्तिकी यात्रा (शुद्ध प्रतिपदा ते वद्य पंचमी), माघ यात्रा (शुद्ध पंचमी ते शुद्ध पौर्णिमा) व चैत्र यात्रा ( शुद्ध पंचमी व शुद्ध पौर्णिमा ) हा कालावधी सोडून इच्छुक भाविकांना उपलब्ध असणार आहेत. सदर योजने प्रमाणे दिनांक 19/02/2015 ते 31/12/2015 या कालावधीतील नित्यपूजेचे बुकींग इच्छुक भाविकांसाठी उपलब्ध करण्यात येत आहे. संबधित एका दिवसाच्या पुजेसाठी ज्या भाविकांचा अर्ज समितीकडे प्रथम प्राप्त होईल त्या भाविकांला सदर पुजेचा मान दिला जाईल.
दुस-या अर्जाचा विचार केला जाणार नाही. इच्छूक भाविकांनी त्यासाठीचा विहीत नमून्यातील अर्ज संपूर्ण भरून, देणगी रक्कम रु. 51,000/- च्या कार्यकारी अधिकारी श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर यांचे नावाचे डिमांड ड्राफ्ट सह रोख रक्कम भरली असल्यास पावतीच्या झेरॉक्स प्रतीसह मंदिर समितीकडे रजिस्टर पोस्टाने किंवा समक्ष दाखल करणे आवश्यक आहे पुजेसाठी उपलब्ध तारखेची माहिती आधी घेऊन अर्ज करणे आवश्यक राहील. पुजेच्या अधिक चौकशीसाठी 02186-224466 व 223550 क्रमांकावर नित्योपचार विभागाकडे संपर्क साधावा.
नित्यपुजेबाबतच्या अटी, शर्ती व नियम :
1. नित्यपूजेच्या वेळी समितीच्या उपस्थित पुजा-यांमार्फत ज्या सूचना देण्यात येतील, त्या सुचनांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक राहील.
2. नित्यपूजेसाठी इच्छुक भाविक व त्यासोबतच्या 9 व्यक्तींना पुजेच्या दिवशी पहाटे 3.45 वाजता व्ही.आय.पी गेट मधून प्रवेश देण्यात येईल. प्रवेशाचे वेळी नित्यपूजा मंजुरीचे मूळ पत्र व सर्वांची मूळ ओळखपत्र तपासून प्रवेश देण्यात येईल. पुजेला मंदिरात येताना पादत्राणे, मोबाईल, कॅमेरा, पर्स इत्यादी वस्तु सोबत आणता येणार नाहीत.
3. नित्यपूजेच्या वेळी इच्छूक भाविकांच्या कुटुंबातील 5 व्यक्तींना ( पती व पत्नी, त्यांचे आई वडील आणि मुले या पैकी 5 व्यक्ती ) पुजेसाठी श्री. विठ्ठलाच्या गाभा-यात प्रवेश दिला जाईल. अशा व्यक्तींची नांवे अर्जात नमूद करणे आवश्यक राहील. तसेच त्यांच्या फोटो ओळखपत्रांच्या झेरॉक्स प्रती अर्जा सोबत जोडणे आवश्यक राहील. तसेच पुजेच्या वेळी मूळ ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.
4. श्री. विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन रांगेतील एका भाविक पती-पत्नीस नित्यपूजेसाठी सहभाग करुन घेणे आवश्यक राहील. सदरच्या भाविक पती-पत्नीची निवड मंदिर समितीच्या नित्योपचार विभागकडून करण्यात येईल.
5. इच्छूक भाविकांच्या कुटुंबातील पूजेसाठी गाभा-यात प्रवेश करणा-या पुरुषांनी सोवळे व उपरणे आणि महिलांनी व लहान मुलांनी स्वच्छ धुतलेली वस्त्र नेसणे आवश्यक राहील.
6.सदर नित्य पूजेच्या वेळी पुजारी श्री.वि़ठ्ठलाला केशर पाणी घालत असताना आपणास हलक्या हाताने श्रीच्या मुर्तीस स्पर्श करुन स्नान घालता येईल. त्यावेळी मूर्तीची झीज होणार नाही या दृष्टीने हातामध्ये अंगठी सारखी कोणतीही वस्तु घालता येणार नाही.
7. श्री. विठ्ठलाचे स्नान झालेनंतर पुजा-या मार्फत पोषाख, नैवैद्य व आरती करण्यात येईल. त्यावेळी आपणासं गाभा-या बाहेर बसविण्यात येईल. त्यानंतर आपल्या 5 व्यक्तींना श्री. विठ्ठलास तुळशी व फुले अर्पण करुन पदस्पर्श दर्शन करुन मंदिर समितीकडून देण्यात येणारा, पेढ्याचा नैवेद्य दाखविता येईल. त्यानंतर आपल्या उर्वरीत 5 नातेवाईकांना श्री. विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शनाला लाभ घेता येईल.
8. नित्यपूजेच्या वेळी इच्छुक भाविकाच्या कुटुंबातील वर नमूद 5 व्यक्ती शिवाय, नात्यातील अन्य 5 व्यक्तींना मंदिरातील चांदीच्या कमानी जवळ बसून पुजा पाहता येईल. त्यांना गाभा-यात प्रवेश दिला जाणार नाही. अशा 5 व्यक्तींची नांवे अर्जात नमूद करणे आवश्यक राहील. तसेच त्यांच्या फोटो ओळखपत्राच्या झेरॉक्स प्रती अर्जा सोबत जोडणे आवश्यक राहील. तसेच पुजेच्या वेळी मुळ ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.
9. पुजेसाठी येत असले बाबातचा खात्रीशीर निरोप पुजेच्या आदल्या दिवशी सांयकाळी 6 वाजेपर्यंत नित्योपचार विभागास देणे आवश्यक आहे.
10. एकदा पुजेचे बुकींग केले नंतर कोणत्याही कारणास्तव रद्द करता येणार नाही व देणगीची रक्कम परत मागता येणार नाही.
11. अति महत्त्वाच्या कारणांसाठी आपली पुजा रद्द करण्याचा अधिकार या कार्यालयास राहील. त्याबाबत कोणतीही तक्रार करता येणार नाही. त्यावेळी पुजेची पुढील उपलब्ध तारीख आपणास देण्यात येईल. किंवा भाविकाची इच्छा असल्यास देणगीची रक्कम परत करण्यात येईल.
12. अपूर्ण माहिती भरलेले आणि अर्जात नमूद केलेली कागदपत्र न जोडलेले अर्ज नामंजूर करण्यात येतील.
13. आपला अर्ज इकडे प्राप्त होण्यास पोस्टा मार्फत विलंब झालेस. हे कार्यालय जबाबदार राहणार नाही.
Thursday, July 5, 2012
विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास ९४ लाखांची देणगी....
आषाढी यात्रा काळात ८ लाखांपेक्षा जास्त भाविकांनी दर्शन घेतले. मंदिर समितीने १६ लाख लाडू निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले होते. दशमी ते पौर्णिमा या पाच दिवसांच्या काळात ७ लाख १२ हजार लाडूंची विक्री झाली. या विक्रीतून मंदिरास ३५ लाख ६१ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. यात्रा काळात विठ्ठल-रुक्मिणी जवळ बसूवन दक्षिणा गोळा करण्यासाठी बोली बोलली जाते. यंदा विठ्ठलाकडील बोली १ लाख ३० हजारांची तर रुक्मिणीकडे ही बोली ३५ हजारांची होती.
Sunday, June 26, 2011
पंढरीच्या वाटेवरी, वारी पर्यावरणाची
'ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली ' चा अखंड जयघोष आणि साथीला पर्यावरण जागृती विषयक फलक हाती घेतलेले वारकरी...! हे चित्र होते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या आळंदी ते पंढरपूर या ' पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी ' या वारीमधले.
पर्यावरण विभाग, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आळंदी ते पंढरपूर अशा पर्यावरण वारीचे आयोजन करण्यात आले आहे. आज कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे सकाळी १०.०० वाजता पुणे महानगरपालिकेचे आयुक्त महेश पाठक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव राधेशाम मोपलवार, मंडळाचे पुणे विभागीय अधिकारी पी.के.मिराशी यांच्या उपस्थितीत या वारीचा शुभारंभ करण्यात आला.
आळंदी ते पंढरपूर या पायी वारीत किर्तन प्रवचन, भारूड, पोवाडे अशा लोककलांच्या माध्यमातून प्लास्टीक हटाव, वसुंधरा बचाव, झाडे लावा झाडे जगवा, उर्जा बचत, पाणी बचत, सेंद्रिय खतांद्वारे हरित क्रांती करा असे विविध संदेशाचे फलक हाती घेऊन वारीला प्रारंभ झाला. सलग 15 दिवस हा संदेश वारीच्या माध्यमातून प्रसारित केला जाणार आहे. या वारीत दोनशे वारकरी सहभागी झाले आहेत. सुप्रसिध्द शाहीर देवानंद माळी, भारूड रत्न चंद्राबाई तिवाडी, ह.भ.प. ज्ञानेश्वर वाबळे आदि वारकरी व लोककलावंतांचा या वारीत समावेश आहे.
प्रारंभी आयुक्त महेश पाठक यांनी नारळ अर्पूण वारीचा प्रारंभ केला. यावेळी वारक-यांनी उस्त्फूर्तपणे केलेल्या किर्तन, भजन व साथीला मृदूंग-टाळांच्या गजराने परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
Thursday, June 16, 2011
वारकरी सांप्रदाय दैनंदिनी २०११
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा दिनक्रम श्री. क्षेत्र आळंदी ते श्री. क्षेत्र पंढरपूर | |||
तिथी | वार दिनांक | सकाळी/दुपारी निघण्याचे ठिकाण | रात्रीचा मुक्काम |
जे. कृ. ८ | शुक्रवार, २४ जून २०११ | आळंदी | आजोळघर |
जे. कृ. ९ | शनिवार, २५ जून २०११ | भोसरी फाटा | भवानीपेठ पुणे |
जे. कृ. १० | रविवार, २६ जून २०११ | भवानी पेठ, पुणे | भवानी पेठ, पुणे |
जे. कृ. ११ | सोमवार, २७ जून २०११ | हडपसर | सासवड |
जे. कृ. १२ | मंगळवार, २८ जून २०११ | सासवड | सासवड |
जे. कृ. १३ | बुधवार, २९ जून २०११ | बोरावके मळा | जेजुरी |
जे. कृ. १४ | गुरुवार, ३० जून २०११ | दौंडंज | वाल्हे |
जे. कृ. ३० | शुक्रवार, १ जुलै २०११ | पिंपरे | लोणंद |
आषाढ शु. १ | शनिवार, २ जुलै २०११ | लोणंद | तरडगाव |
आषाढ शु. २ | रविवार, ३ जुलै २०११ | काळज सुखडी फाटा | फलटण |
आषाढ शु. ३ | सोमवार, ४ जुलै २०११ | विडणी | बरड |
आषाढ ४/५ | मंगळवार, ५ जुलै २०११ | साधुबोवाचा ओढा | नातेपुते |
आषाढ ६ | बुधवार, ६ जुलै २०११ | मांडवी ओढा | माळशिरस |
आषाढ ७ | गुरुवार, ७ जुलै २०११ | गोल रिंगण खुड्डुस फाटा | वेळापूर |
आषाढ ८ | शुक्रवार, ८ जुलै २०११ | ठाकूरबोवा समाधी | भंडीशेगाव |
आषाढ ९ | शनिवार, ९ जुलै २०११ | भंडीशेगाव | वाखरी तळ |
आषाढ १० | रविवार, १० जुलै २०११ | वाखरी | श्री क्षेत्र पंढऱपूर |
| | | |
जगतगुरु तुकाराम महाराजांच्या पालकी सोहळ्याचा दिनक्रम श्री. क्षेत्र देहू ते श्री. क्षेत्र पंढरपूर | |||
जे. कृ. ७ | बुधवार, २२ जून २०११ | पालखी प्रस्थान सोहळा | |
जे. कृ. ८ | गुरुवार, २३ जून २०११ | तुकाराम महाराज पालखी | आकुर्डी |
जे. कृ. ८ | शुक्रवार, २४ जून २०११ | स.वि.ए. कॉलनी पिंपरी | नानापेठ पुणे |
जे. कृ. ९ | शनिवार, २५ जून २०११ | नाना पेठ पुणे | नाना पेठ पुणे |
जे. कृ. १० | रविवार, २६ जून २०११ | भैरोबा नाका | लोणी काळभोर |
जे. कृ. ११ | सोमवार, २७ जून २०११ | कुंजीरवाडी फाटा | यवत |
जे. कृ. १२ | मंगळवार, २८ जून २०११ | भांडगाव | वरवंड |
जे. कृ. १३ | बुधवार, २९ जून २०११ | भागवत वस्ती | उंडवडी गवळयाची |
जे. कृ. १४ | गुरुवार, ३० जून २०११ | उंडवडी पठार | बारामती |
जे. कृ. ३० | शुक्रवार, १ जुलै २०११ | मोतीबाग लिमटेक | सणसर |
आषाढ शु. १ | शनिवार, २ जुलै २०११ | बेलवाडी | लासुर्णे |
आषाढ शु. २ | रविवार, ३ जुलै २०११ | अंथुर्णे | निमगाव केतकी |
आषाढ शु. ३ | सोमवार, ४ जुलै २०११ | तरंगवाडी पाट | इंदापूर |
आषाढ शु. ४/५ | मंगळवार, ५ जुलै २०११ | गोकुळीचा ओढा | सराटी |
आषाढ शु. ६ | बुधवार, ६ जुलै २०११ | गोल रिंगण माने विद्यालय | अकलुज |
आषाढ शु. ७ | गुरुवार, ७ जुलै २०११ | उभे रिंगण मळीनगर | बोरगाव |
आषाढ शु. ८ | शुक्रवार, ८ जुलै २०११ | माळखांबी | पिराची कुरोली |
आषाढ शु. ९ | शनिवार, ९ जुलै २०११ | पिराची कुरोली | वाखरी तळ |
आषाढ शु. १० | रविवार, १० जुलै २०११ | श्री क्षेत्र पंढरपूर | श्री क्षेत्र पंढरपूर |