Friday, October 31, 2008

कार्तिकी यात्रा - दिनांक 9 आँक्टोबर 2008 पासून सुरु होत आहे.

दिनांक ९ नोव्हेंबर 2008 रोजी कार्तिक, पंढरपूर यात्रा.
दिनांक 23 नोव्हेंबर 2008 रोजी आंळदी यात्रा.
दिनांक 25 नोव्हेंबर 2008 रोजी ज्ञानेश्वर महाराज समाधी उत्सव - आंळदी
कार्तिकी यात्रा. : कार्तिक शुध्द एकादशीला पंढरपुरात मोठी यात्रा भरत असते. या यात्रेनंतर संतमंडळी व चातुर्मासात भगवद्चिंतनासाठी राहिलेले वारकरी लोक आपापल्या गावी जातात. चातुर्मास संपतो, या यात्रेत नदीच्या वाळवंटात जागोजागी कीर्तनाचे फड असतात. गावातील मठ-मदिरांतून, धर्मशाळेतूनही कीर्तन, भजनाचे कार्यक्रम होत असतात. एकादशीचे दिवशी श्रीविठ्ठलाचा रथ नगरप्रदक्षिणेला निघत असतो. दिंडया निघतात. पैर्णिमेला गोपाळकाला (गोपाळपूर येथे) व त्याच्या दुसरे दिवशी मंदिरात आषाढी यात्रेप्रमाणे महाद्वार काला होतो. या यात्रेला कर्नाटकातून पालख्या व दिंडया येतात. विजापूर, हुबळी, धारवाड, बेळगाव इ. जिल्ह्यांतून लाखो लोक पंढरपूरला येतात. विजापूर जिल्ह्यात इंचगिरी संप्रदायाची शिष्यमंडळी आहेत. भाऊसाहेब महाराज उमदीकर, रामभाऊ रानडे इ. थोर सत्पुरुषांनी भागवत धर्माच्या प्रसाराचे महान कार्य या भागात केले आहे. या प्रांतातील विविध मंदिरांतून श्रीज्ञानेश्वरीच्या निरुपणाचे कार्य, कीर्तने, प्रवचन-पायारणे इ. कानडी भाषेतून चालते. यात्रेच्या निमित्ताने भागवत धर्माच्या प्रचारा-प्रसारामुळे प्रांतभेद संपून स्नेहसंबंध दृढमूल होत आहेत. ''कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु । तेणे मज लावियेला वेधु ॥'' या अभंगातून 'श्रीविठ्ठल' कर्नाटक व महाराष्ट्रातील (भाषा भिन्न असूनही) वारकऱ्यांना भक्तिसूत्राने एकत्रित आणणारा महत्त्वाचा दुवा आहे.

पा

चालू पंढरीच्या वाटेवर... वाचा http://viththal.blogspot.com/

चालू पंढरीच्या वाटेवर... वाचा http://viththal.blogspot.com/
पंढरीच्या आस प्रत्येक वारक-याच्या उरी असते. विठ्ठलाच्या भेटीसाठी कित्येक मैल वाट तुडवत वारकरी आळंदी-देहूत दाखल होत असतात, दरवर्षी न चुकता, कोणत्याही निमंत्रणाशिवाय लाखो वारकरी या सोहळ्यात रंगून जातात. अशा 2008 रोजी झालेल्या वारीचे वर्णन वाचण्यासाठी ई सकाळचे शंकर टेमघरे यांनी त्यांच्या http://viththal.blogspot.com/ ब्लाँग चांगल्या प्रकारे वर्णन केले आहे. चे वाचत असताना आपल्या डोळ्यासमोर वारीतील दिवसभराचा दिनक्रम उभा राहतो.