Sunday, June 26, 2011

पंढरीच्या वाटेवरी, वारी पर्यावरणाची


'ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली ' चा अखंड जयघोष आणि साथीला पर्यावरण जागृती विषयक फलक हाती घेतलेले वारकरी...! हे चित्र होते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या आळंदी ते पंढरपूर या ' पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी ' या वारीमधले.

पर्यावरण विभाग, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आळंदी ते पंढरपूर अशा पर्यावरण वारीचे आयोजन करण्यात आले आहे. आज कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे सकाळी १०.०० वाजता पुणे महानगरपालिकेचे आयुक्त महेश पाठक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव राधेशाम मोपलवार, मंडळाचे पुणे विभागीय अधिकारी पी.के.मिराशी यांच्या उपस्थितीत या वारीचा शुभारंभ करण्यात आला.

आळंदी ते पंढरपूर या पायी वारीत किर्तन प्रवचन, भारूड, पोवाडे अशा लोककलांच्या माध्यमातून प्लास्टीक हटाव, वसुंधरा बचाव, झाडे लावा झाडे जगवा, उर्जा बचत, पाणी बचत, सेंद्रिय खतांद्वारे हरित क्रांती करा असे विविध संदेशाचे फलक हाती घेऊन वारीला प्रारंभ झाला. सलग 15 दिवस हा संदेश वारीच्या माध्यमातून प्रसारित केला जाणार आहे. या वारीत दोनशे वारकरी सहभागी झाले आहेत. सुप्रसिध्द शाहीर देवानंद माळी, भारूड रत्न चंद्राबाई तिवाडी, ... ज्ञानेश्वर वाबळे आदि वारकरी लोककलावंतांचा या वारीत समावेश आहे.

प्रारंभी आयुक्त महेश पाठक यांनी नारळ अर्पूण वारीचा प्रारंभ केला. यावेळी वारक-यांनी उस्त्फूर्तपणे केलेल्या किर्तन, भजन साथीला मृदूंग-टाळांच्या गजराने परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

Thursday, June 16, 2011

वारकरी सांप्रदाय दैनंदिनी २०११

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा दिनक्रम

श्री. क्षेत्र आळंदी ते श्री. क्षेत्र पंढरपूर
(२४ जून ते १५ जुलै २०११ )

तिथी

वार दिनांक

सकाळी/दुपारी निघण्याचे ठिकाण

रात्रीचा मुक्काम

जे. कृ. ८

शुक्रवार, २४ जून २०११

आळंदी

आजोळघर

जे. कृ. ९

शनिवार, २५ जून २०११

भोसरी फाटा

भवानीपेठ पुणे

जे. कृ. १०

रविवार, २६ जून २०११

भवानी पेठ, पुणे

भवानी पेठ, पुणे

जे. कृ. ११

सोमवार, २७ जून २०११

हडपसर

सासवड

जे. कृ. १२

मंगळवार, २८ जून २०११

सासवड

सासवड

जे. कृ. १३

बुधवार, २९ जून २०११

बोरावके मळा

जेजुरी

जे. कृ. १४

गुरुवार, ३० जून २०११

दौंडंज

वाल्हे

जे. कृ. ३०

शुक्रवार, १ जुलै २०११

पिंपरे

लोणंद

आषाढ शु. १

शनिवार, २ जुलै २०११

लोणंद

तरडगाव

आषाढ शु. २

रविवार, ३ जुलै २०११

काळज सुखडी फाटा

फलटण

आषाढ शु. ३

सोमवार, ४ जुलै २०११

विडणी

बरड

आषाढ ४/५

मंगळवार, ५ जुलै २०११

साधुबोवाचा ओढा

नातेपुते

आषाढ ६

बुधवार, ६ जुलै २०११

मांडवी ओढा

माळशिरस

आषाढ ७

गुरुवार, ७ जुलै २०११

गोल रिंगण खुड्डुस फाटा

वेळापूर

आषाढ ८

शुक्रवार, ८ जुलै २०११

ठाकूरबोवा समाधी

भंडीशेगाव

आषाढ ९

शनिवार, ९ जुलै २०११

भंडीशेगाव

वाखरी तळ

आषाढ १०

रविवार, १० जुलै २०११

वाखरी

श्री क्षेत्र पंढऱपूर

जगतगुरु तुकाराम महाराजांच्या पालकी सोहळ्याचा दिनक्रम

श्री. क्षेत्र देहू ते श्री. क्षेत्र पंढरपूर
(२२ जून ते १५ जुलै २०११ )

जे. कृ. ७

बुधवार, २२ जून २०११

पालखी प्रस्थान सोहळा

जे. कृ. ८

गुरुवार, २३ जून २०११

तुकाराम महाराज पालखी

आकुर्डी

जे. कृ. ८

शुक्रवार, २४ जून २०११

स.वि.ए. कॉलनी पिंपरी

नानापेठ पुणे

जे. कृ. ९

शनिवार, २५ जून २०११

नाना पेठ पुणे

नाना पेठ पुणे

जे. कृ. १०

रविवार, २६ जून २०११

भैरोबा नाका

लोणी काळभोर

जे. कृ. ११

सोमवार, २७ जून २०११

कुंजीरवाडी फाटा

यवत

जे. कृ. १२

मंगळवार, २८ जून २०११

भांडगाव

वरवंड

जे. कृ. १३

बुधवार, २९ जून २०११

भागवत वस्ती

उंडवडी गवळयाची

जे. कृ. १४

गुरुवार, ३० जून २०११

उंडवडी पठार

बारामती

जे. कृ. ३०

शुक्रवार, १ जुलै २०११

मोतीबाग लिमटेक

सणसर

आषाढ शु. १

शनिवार, २ जुलै २०११

बेलवाडी

लासुर्णे

आषाढ शु. २

रविवार, ३ जुलै २०११

अंथुर्णे

निमगाव केतकी

आषाढ शु. ३

सोमवार, ४ जुलै २०११

तरंगवाडी पाट

इंदापूर

आषाढ शु. ४/५

मंगळवार, ५ जुलै २०११

गोकुळीचा ओढा

सराटी

आषाढ शु. ६

बुधवार, ६ जुलै २०११

गोल रिंगण माने विद्यालय

अकलुज

आषाढ शु. ७

गुरुवार, ७ जुलै २०११

उभे रिंगण मळीनगर

बोरगाव

आषाढ शु. ८

शुक्रवार, ८ जुलै २०११

माळखांबी

पिराची कुरोली

आषाढ शु. ९

शनिवार, ९ जुलै २०११

पिराची कुरोली

वाखरी तळ

आषाढ शु. १०

रविवार, १० जुलै २०११

श्री क्षेत्र पंढरपूर

श्री क्षेत्र पंढरपूर