Sunday, June 14, 2009

'विठ्ठल भेटला भेटला'

येत्या सोमवारी देहूचा आणि मंगळवारी आळंदीचा देऊळवाडा टाळमृदुंगांच्या आवाजाने दुमदुमून जाईल... आषाढी एकादशीला पंढरीच्या विठ्ठलाला भेटण्यासाठी तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली मुक्काम सोडतील.. आणि अवघा महाराष्ट्र तनाने नाही तर किमान मनाने तरी त्यांच्या सोबत चालू लागेल... गेल्या सातशे वर्षाहून अधिक काळ हा सोहळा अव्याहतपणे सुरू आहे. त्यासाठी ना कुणाला आमंत्रणाची गरज ना मानपानाची... शेतातल्या पेरण्या आवरून भाबडा वारकरी पंढरीच्या वाटेला लागेल... मग त्याला उन्हाची तमा नसेल की पावसाची भीती... लक्षलक्ष पावले पंढरीची वाट चालू लागतील आणि ग्यानबा-तुकारामच्या जयघोषात सारा महाराष्ट्र भारावून जाईल. डोळ्याचे पारणे फिटावे असा हा सोहळा. ज्येष्ठ शुद्ध सप्तमीला देहूहून तर अष्टमीला आळंदीहून सुरू होणारा... आषाढी एकादशीला वारी पंढरीला पोहचत असली तरी सारा सोहळा आषाढ पौणिर्मेच्या काल्यापर्यंत जवळपास महिनाभर चालतो. हा सोहळा अनुभवावा असे अनेकांना मनापासून वाटत असले तरी प्रत्येकाला जाणे शक्य नसते. अशा अनेकांसाठी पीटीआयचे फोटोग्राफर शिरीष शेटे यांनी हा हृदयस्पर्शी 'अनुभव' आपल्या कॅमेरामध्ये टिपला आहे. वारीतील उत्कट क्षणांचे दर्शन घडवणाऱ्या त्यांच्या फोटोंचे 'वारी-पाथ टू द डिव्हाईन' हे पुस्तक प्रकाशित झाले. त्यात प्रस्थानापासून पंढरपूरपर्यंतचे विविध टप्पे त्यांनी आपल्या कॅमेऱ्यामधून टिपले आहेत. तसेच पंढरपूरच्या विठ्ठलरखुमाईचे आणि ज्ञानोबा-तुकारामांचे मंदिरातील श्रीमूर्तींचे त्यांनी काढलेले अप्रतिम फोटो या पुस्तकात आहेत. प्रत्येक फोटोची इंग्रजीतून दिलेली माहिती आणि त्याला दिलेल्या अभंगाच्या जोडीमुळे हे पुस्तक महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून इतर वाचकांपर्यंत जाण्यास सिद्ध झाले आहे. त्यामुळे हे पुस्तक पाहिल्यावर वारीला न गेलेल्याही माणसाची अवस्था 'विठ्ठल भेटला भेटला' अशी झाली तर आश्चर्य वाटायला नको.
- महाराष्ट्र टाइम्स, दिनांक १५ जून २००९

Sunday, January 4, 2009

राज्यातील जनतेच्या समृध्दीसाठी मुख्यमंत्र्यांची श्री विठ्ठल चरणी प्रार्थना....

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रविवारी भेट देऊन सपत्नीक श्री विठ्ठलाची तुळशीअर्चन पूजा केली. राज्यातील जनतेला सुख, शांती, समृध्दी लाभो, असे साकडे त्यांनी यावेळी श्री विठ्ठल चरणी घातले. मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, शहरात येणार्‍या भाविकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याचे प्रयत्न शासन करीत आहे. याकामाला गती देण्यासाठी पंढरपूर शहरासाठी वेगळे प्राधिकरण निर्माण करुन तिर्थक्षेत्र तुळजापूरच्या धर्तीवर पंढरपूर तिर्थक्षेत्राचा विकास केला जाईल.राज्यातील चाळीस लाख शेतकर्‍यांना ६ हजार २०८ कोटींची कर्जमाफी देण्याचा निर्णय आघाडी शासनाने विचारपूर्वक घेतला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. ग्रामविकास राज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह, माजी मंत्री जयवंत आवळे आदी यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी रविवारी सकाळी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे हेलिकॉप्टरने पंढरपूर येथे आगमन झाले. यावेळी केंद्रीय ऊर्जामंत्री सुशिलकुमार शिंदे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आ. सुधाकरपंत परिचारिक आदी उपस्थित होते.

Wednesday, November 12, 2008

स्टार माझा मराठी ब्लाँग पारितोषिक वितरण सोहळा दिनांक 8 नोव्हेंबर 2008 रोजी 8.00 वाजता स्टार माझा चॅनलवर..

स्टार माझा मराठी ब्लाँग पारितोषिक वितरण सोहळा मध्ये माझ्या ब्लाँगला तुतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले यांची विडिओ क्लीप...
video

Friday, October 31, 2008

कार्तिकी यात्रा - दिनांक 9 आँक्टोबर 2008 पासून सुरु होत आहे.

दिनांक ९ नोव्हेंबर 2008 रोजी कार्तिक, पंढरपूर यात्रा.
दिनांक 23 नोव्हेंबर 2008 रोजी आंळदी यात्रा.
दिनांक 25 नोव्हेंबर 2008 रोजी ज्ञानेश्वर महाराज समाधी उत्सव - आंळदी
कार्तिकी यात्रा. : कार्तिक शुध्द एकादशीला पंढरपुरात मोठी यात्रा भरत असते. या यात्रेनंतर संतमंडळी व चातुर्मासात भगवद्चिंतनासाठी राहिलेले वारकरी लोक आपापल्या गावी जातात. चातुर्मास संपतो, या यात्रेत नदीच्या वाळवंटात जागोजागी कीर्तनाचे फड असतात. गावातील मठ-मदिरांतून, धर्मशाळेतूनही कीर्तन, भजनाचे कार्यक्रम होत असतात. एकादशीचे दिवशी श्रीविठ्ठलाचा रथ नगरप्रदक्षिणेला निघत असतो. दिंडया निघतात. पैर्णिमेला गोपाळकाला (गोपाळपूर येथे) व त्याच्या दुसरे दिवशी मंदिरात आषाढी यात्रेप्रमाणे महाद्वार काला होतो. या यात्रेला कर्नाटकातून पालख्या व दिंडया येतात. विजापूर, हुबळी, धारवाड, बेळगाव इ. जिल्ह्यांतून लाखो लोक पंढरपूरला येतात. विजापूर जिल्ह्यात इंचगिरी संप्रदायाची शिष्यमंडळी आहेत. भाऊसाहेब महाराज उमदीकर, रामभाऊ रानडे इ. थोर सत्पुरुषांनी भागवत धर्माच्या प्रसाराचे महान कार्य या भागात केले आहे. या प्रांतातील विविध मंदिरांतून श्रीज्ञानेश्वरीच्या निरुपणाचे कार्य, कीर्तने, प्रवचन-पायारणे इ. कानडी भाषेतून चालते. यात्रेच्या निमित्ताने भागवत धर्माच्या प्रचारा-प्रसारामुळे प्रांतभेद संपून स्नेहसंबंध दृढमूल होत आहेत. ''कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु । तेणे मज लावियेला वेधु ॥'' या अभंगातून 'श्रीविठ्ठल' कर्नाटक व महाराष्ट्रातील (भाषा भिन्न असूनही) वारकऱ्यांना भक्तिसूत्राने एकत्रित आणणारा महत्त्वाचा दुवा आहे.

पा

चालू पंढरीच्या वाटेवर... वाचा http://viththal.blogspot.com/

चालू पंढरीच्या वाटेवर... वाचा http://viththal.blogspot.com/
पंढरीच्या आस प्रत्येक वारक-याच्या उरी असते. विठ्ठलाच्या भेटीसाठी कित्येक मैल वाट तुडवत वारकरी आळंदी-देहूत दाखल होत असतात, दरवर्षी न चुकता, कोणत्याही निमंत्रणाशिवाय लाखो वारकरी या सोहळ्यात रंगून जातात. अशा 2008 रोजी झालेल्या वारीचे वर्णन वाचण्यासाठी ई सकाळचे शंकर टेमघरे यांनी त्यांच्या http://viththal.blogspot.com/ ब्लाँग चांगल्या प्रकारे वर्णन केले आहे. चे वाचत असताना आपल्या डोळ्यासमोर वारीतील दिवसभराचा दिनक्रम उभा राहतो.

Tuesday, October 14, 2008

'स्टार माझा' चे आभार...

'स्टार माझा' चे आभार... आणि प्रसन्न जोशी व अच्युत गोडबोले यांना धन्यवाद...
'स्टार माझा' ने मराठी ब्लाँग स्पर्धोसाठी तृतीय क्रमांकासाठी निवड दिनांक 11 आँक्टोबर 2008 'वेब माझा' या कार्यक्रमात करण्यात आली. आनंद वाटला. पंढरपूरविषयीच्या माहितीच्या ह्या ब्लाँगची आवर्जुन दखल घेतली. त्याबद्दल मी 'स्टार माझा' चे मन:पूर्वक आभार मानतो.
धन्यवाद
विश्वनाथ खांदारे

Tuesday, July 1, 2008

शोध विठ्ठलाचा


विठ्ठल हे वारक-यांचे जग. वारक-यांचा आत्मा आणि त्यांच्या जगण्याचा मार्ग झालेला आहे. एकविसाव्या शतकात तर हा HRD चा शोधविषय ठरलेला आहे. महाराष्ट्राची संत-पंरपरा ही विठ्ठलमय युग म्हणुनच ओळखली जाते. ह्या युगाचा विठ्ठल हा कर्ता कसा झाला? तो आला कुठून? हे आणि यासम अनेक प्रश्न उपस्थित केले जावू लागले आणि यातूनचं विठ्ठलाचा शोध सुरू झाला. आजचा जो पंढरपूरचा परिसर आहे तो पूर्वी भांडरंग वट्टीग म्हणून ओळखला जायचा. भीमा आणि चंद्रभागा या दोन नद्यांच्या मधोमध हा भांडरंग परिसर होता.त्यामुळे ह्या परिसरात गाळाची व पांढरीची भरपूर जमिन होती. ह्या जमिनीत चिंच,आंबा,वड तसेच पिंपळ आदी मोठ्या वृक्षांची घनदाट झाडी होती. यामुळे या परिसरात घनदाट सावली,थंडगार वहाते नदीचे पाणी व गुरांच्या चा-याची विपुलता अधिक होती.यास्तव इथे गुरे,ढोरे, मेंढरे व त्यामागे हिंडणा-या गोपजंनाचा आणि धनगरांचा सतत वावर होता.त्याकाळात किंवा त्याहीअगोदर म्हणजे महाभारताच्या काळापासून या भागात गोधनासाठी हल्ले, दरोडे,मारामा-या तसेच लहान-सहान लढायादेखील होत हो्त्या. अशाच एका लढाईत येथे वावरणा-या एका गोपजनांच्या टोळीप्रमुखाने पराक्रम गाजवून दरोडेखोरांच्या टोळींचा कायमचा नायनाट केला.पंरतू दुदैवाने या लढाईत टोळीप्रमुख मारला गेला.त्याच्या अनुयायांनी त्याच्या अंत्यसंस्काराच्या जागेवर मोठी,उभी शिळा उभारली.हीच स्मारकशिळा- स्मारकस्तंभ-किंवा त्याला लोकभाषेत भडखंभाही म्हटले जाते. पुढे हाच भडखंभा देव झाला.श्रद्धेने लोक त्याची पूजा करू लागले.त्याच्याकडे नवस फेडू लागले.त्याचा महीमा आजूबाजूस लोकांना समजू लागला.हळूहळू त्याच्याभोवती श्रद्धावान लोकांची गर्दी वाढू लागली.त्याच्या कृपाप्रसादासाठी लांबून-लांबून लोकं येवू लागली.ह्या भडखंब्यात गोपजनांनी धनगरी वेषात टोळीप्रमुखाची छबी कोरली आणि त्यानंतर तो आदिदेव झाला. या आदिदेवाचा पोषाख त्यांच्याच पोषखासारखा घडविलेला होता.पूजा-अर्चा यांचे फार अंवडबर नव्हते. मुर्तीच्या पायावर पाणी ओतावे,आसपासची रानटी फुले पायावर वहावी.कपाळी बुक्का लावला व मुर्तीच्या पायाला कवटाळून आपले दु:ख दैन्य सांगावे इतकेच घडे. मात्र यानंतर आपण सुखी होणार अशी त्यांची पक्की श्रद्धा होती. यानंतर पुजेचे हे प्रस्थ वाढले ते आजतगायत होय.आजच्या विठठ्लाचे रूप हेदेखिल वरील कथेशी मिळते-जुळते आहे. दुसरे असे की, पुराणांतील कथांनुसार पुंडलिकाने फेकलेल्या विटेंवर विठ्ठल य़ुगांनयुगे उभा आहे ही आख्यायिका, तर मग पुंडलिकाचा ईतिहास काय? तोदेखिल तपासणे हा शोधनिबंधाचाच भाग ठरेल.मुख्यत्वे श्री विठठ्ल आणि पंढरपूर या संबधात संशोधनाचे कार्य अनेक विचारवंतानी, जिज्ञासूंनी केले आहे. त्यांनी केलेल्या संशोधनाचा देखिल आपणास विचार करणे गरजेचे आहे. 'बरवे बरवे पंढरपूर'पुस्तकाचे लेखक आबासाहेब भाटे यांच्या मते 'श्री विठ्ठल देवासंबधित अनेक कल्पना आहेत.महानुभाव पंथीयांच्या 'लीळाचरित्र' नावाच्या ग्रंथात श्री.चक्रधर स्वामींच्या मुखी या विठ्ठलासंबधी जी निंदाव्यंजक {प्रकरण saatave } घातली आहे; ती कथाही याच घटनेकडे बोट दर्शविते. त्या कथेतील पांडु हा ब्राम्हण, नेमा हा शिंपी व म्हाया {मूळ महादेव} हा कोळी यांनाच दरोडेखोर ठरवून, पांडुरंगाची,नामा शिंप्याची {नामदेवाची} निंदा केली व शेवटी बाप रखमा देवीवरू'' या वचनाचा उल्लेख करून श्री.ज्ञानेश्वर महाराजांचीही निंदाच केली. याही कथांतून केवळ विठठ्लाचे अस्तित्व कशाप्रकारे होते ते कळते.आता त्याचे नाव कुठुन आले? याचा शोध घेता असे समजते की, गोपजनांच्या ह्या देवाचे नाव त्यांच्या गावावरून दिले गेले असावे. कारण गावाचे नाव पंडूचे क्षेत्र-पंडरंगे-यावरून पांडूरंग असे नाव पडले. ईतिहासाची सांगड घालता असे दिसून .येते की, ईसवीसनाच्या दुस-या किंवा तिस-या शतकांत या आदिदेवाचे म्हणजे लोकदेवाचे श्रीकृष्णस्वरूप जनमानसात मूळ धरू लागले आणि ते चहूबाजूस पसरले. संस्कृत साहित्याचा अभ्यास करून विठठ्लाचा शोध घेण्या-यांमध्ये संशोधक ग.ह.खरे, रा.श.वाळींबे, शं.गो.तुळपुळे,डा.गुंथर सोथायमर,धनपलवार,दलरी, रा.चिं.ढेरे आदींचा आवर्जून उल्लेख करावयास हवा. कारण यामुळे विठठ्लाची अनेक रूपे समोर आली आहेत. प्रख्यात शाहीर श्री.रामजोशीबुवा (सोलापूरकर) यांची एक पंढरपूरावर लिहिलेली प्रसिध्द लावणी आहे.त्यात ते पंढरपूरला, पांडुरंगपूर असे न म्हणता उमामहेश्वरपुरी असा स्पष्ट उल्लेख करतात